••• संतांची सामाजिक फलश्रुती •••
परमेश्वर भावाचा भुकेला आहे . त्याला भौतिक गोष्टीमध्ये विशेष रस नाही . मनापासून केलेली प्रत्येक गोष्ट त्याला आवडते. तो त्यात रममाण होतो. त्याची भक्ती कशी करावी ? त्यासाठी संत रामदासांनी नवविधा भक्ती सांगितल्या आहेत.त्यातही कीर्तनभक्ती बहुश्रुत व आनंददायी आहे. भगवंत हि स्वतः त्यात रममाण होतात.
तर अश्या या भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी किव्हा त्याच्या ठायी आपण विसावण्यासाठी काय काय करायला हवे हे आपल्या सर्व संतश्रेष्टानी सांगितल आहे. सर्व संतजनानी मानवजातीला अगदी भरभरून दिल आहे. त्याची उतराई होणे शक्यच नाही. त्याची फलश्रुती फार महत्वाची आहे. मानव्य म्हणजे काय , हे त्यांनी समस्त मानवांना समजावले. सकळ जनास शहाणे करून सोडले. त्यामागची समाजोद्धाराची ती तळमळ, तगमग सर्वश्रुत आहेच. त्यासाठी त्यांना कितीतरी हालअपेष्टाना सामोरे जावे लागले. पण ते डगमगले नाहीत. कावडीतले पाणी एकनाथांनी गाढवाला पाजले., एकनाथांची नदीची वारंवार केलेली अंघोळ. ज्ञानेश्वरांना झालेला त्रास. मीराबाईला झालेला त्रास .इत्यादी अनेक उदाहरणे देता येतील.
सगुण, निर्गुण, परमेश्वर, आत्मा, सत्य, असत्य, देह, भक्ती, योग, समाधी, आनंद, निराकार, मूर्त, अमूर्त इत्त्यादी इत्त्यादी . हे सर्व जीवन जगताना कसे अनुभावावे, हे संतानी शिकवले. समाजप्रबोधनाचे महत्वाचे काम या संतानी केलेले आहे. संत रामदास स्वामिनी तर अगदी बारीक सारीक गोष्टीवर सुद्धा भाष्य केले आहे. तेही अगदी सोप्यातल्या सोप्या भाषेत. त्यांचे मनाचे श्लोक, दासबोध, हे तर माणसाने जीवन कसे जगावे, हे सांगणारी दीपिकाच आहे. ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण, गीता हे जीवनाचे मार्गदर्शक ग्रंथ आहेत. अगदी थोडक्यात सांगायचे म्हणजे एक तरी ओवी अनुभवावी हे दस्तुरखुद्द ज्ञानेश्वरांनीच सांगून ठेवले आहे. थोडक्यात काय तर सारांश असा कि व्रत वैकल्ये किव्हा कर्म कांडाच्या मागे जास्त न लागता संतानी सांगितलेल्या फलश्रुतीनुसार त्यांचा उपदेश आपल्याला आचरणात आणायचा आहे. तर मग आपणाला त्याचे फळ मिळाल्याचे समाधान लाभणार आहे. पूजा अर्चा व इतर सर्व गोष्टी आवश्यक आहेत पण ती साधने आहेत. आपल्याला अत्युच्य आनंदापर्यंत पोहोचायच आहे. म्हणजेच परमेश्वर प्राप्ती करायची आहे. त्या साधनाना जास्त कवटाळून बसण्याचे कारण नाही. साधन साध्य होता कामा नये. त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे किव्हा आपल्या आनंदाप्रत पोहोचण्याच्या त्या पायऱ्या आहेत. आणि पायऱ्या म्हणजे परमेश्वर नव्हे. याची आपण नोंद घेतली पाहिजे.
या सर्व संतानी भरीव असे सामिजिक कार्य करून ठेवले आहे. तो वारसा आपणाला पुढे चालवायचा आहे. तो हि आपल्याच म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी , आनंदासाठी. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात सांगितल्याप्रमाणे हे विश्वची माझे घर, ही उक्ती आपले ब्रीदवाक्य व्हायला हवे. संतानी याला मंत्राची ताकद दिली. त्यामुळे हे विश्व एकजीव होणार आहे. या जगतात बंधू भाव नित्य वासू दे . दे वरची असा दे. ही उक्ती खरी करून दाखवायची आहे. संतांचे कार्य पुढे चालू ठेवायचे असेल तर हेच आपले ध्येय व्हायला हवे. कारण यातच संपूर्ण मानवजातीचे कल्याण आहे. हीच संतांची सामाजिक फलश्रुती आहे. यासाठी आपण झटायचे आहे.
संत मीराबाईची कृष्णभक्ती पतीपत्नीत यायला हवी. एकनाथांची पशुदया आपल्या अंगात मुरायला हवी. असे असेल तर परमेश्वर आपल्याला फार मोठी शक्ती देतो. उर्जा देतो. हे सर्व अगदी वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता येत नाही पण त्याची अनुभूती नक्की येते. तुकारामांच्या अभंगातून प्रेरणा घ्यावी. ज्ञानेश्वरी व पसायदानातून सगुण, निर्गुण धर्म, वसुधा एव कुटुंबकम इत्त्यादी जाणून घ्यावे. नामदेव, रामदास, कबीर , चोखा मेळा, एकनाथ, तुकाराम, मीराबाई, बहिणाबाई या सर्व संतांच्या मंदियाळीतून आपणाला खूप काही घ्यायचे आहे, शिकायचे आहे व आचरणात आणायचे आहे. हे सर्व घेत घेत आपणही दुसऱ्याला तेच परत देत जायचे आहे. म्हणतात न ....देणाऱ्याने देत जावे , घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देनाराच्ये हात घ्यावे. म्हणजेच दातृत्व घ्यावे.आपली संस्कृती खूप खूप संपन्न आहे. पुराने, ग्रंथ, वेद, यातून घुप घेण्यासारखे आहे. त्याचा प्रसार व प्रचार व्हायला हवा.
हे यासाठी आवश्यक आहे कि काल फार झपाट्याने बदलत आहे. अनिस्था प्रवृत्ती, दहशतवाद, गुंडगिरी, दादागिरी, भ्रस्टाचार चांदल्च मुल घृ पाहत आहे. न्याय दडून बसत आहे आणि अन्याय उघड्या छातीने सर्रास चोहोकडे फिरता आहे.अक्षर्धान्म जळत आहे. संसद द्हाशातीमध्ये वावरत आहे. या सर्व अनिष्ठ गोष्टी पूर्ण विशावला कवेत घेऊ पाहत आहे. त्यावर प्रबोधन हेच औषध आहे. कि जे संतानी आपणाला दिले आहे. हे फार मोठे व पवित्र कार्य आपणास हाती घेवून तडीस न्यायचे आहे. हा महायज्ञ आहे. सज्जनहो, विचार करा. आपण सर्वांनी खारीचा का होयीना पण वाट या कामात उचाल्याचा आहे.
साहित्यिकांनी साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन करावे. प्रवचनं कीर्तन, अभंग, भजन व्य्ख्यान, निरुपण, काव्य, लेख, कथा, चित्रपट, नात्याक, भाषण, वक्तृत्व, पोवाडा, गाणें इत्त्यादी अनेकविध माद्यमातून हे कार्य करायचे आहे.समाज्माने आपल्याला जिंकायची आहेत, समाजमन तयार करायचे आहे. लोकांची माने जिंकताना ते नाराज होणार नाहीत याचीही काळजी ज्ञायाची आहे. यांच्या मनातील वाक्रपणा घालवायचा आहे. मूलतः ते चान्लेच आहेत, व ते आपल्याच कुटुंबाचे सदस्य आहे. संतांच्या शिकवणीचे आचरण मनन चिंतन, आपल्याला करायचे आहे.
ज्ञानेश्वर, मुक्ती, तुकाराम, रामदास, सोपान, कबीर, जनी, बहिणाबाई, नमदेओ इत्त्यादी, संतानी सत्कार्यारूपी मंदिर बांधून ठेवले आहे. त्याचे जतन करायची जबाबदारी आपल्यावर आहे. टी आपल्याला निभवायची आहे .त्यासाठी डोळ्यात टेल घालून आपण सज्ज राहायला हवे. अनुबंब, रासायनिक बोंब , क्षेपणास्त्रे, यांच्यैताकीच मानवी मनेही वाईट झाली आहेत. टी वाईट माने आपल्याला बदलायची आहेत. वालावायाची आहेत, चांगली कार्यायाची आहेत. कि ज्यायोगे अनु उर्जेचा उपयोग मानवाच्या आनंदासाठी म्हणजे वीजनिर्मिती, औशादानिर्मिती इत्त्यादी सत्कार्याबद्दल करतील. हा मुलभूत बदल प्रत्येक मानवी मनात करायचा आहे. तो प्रबोधनातून होणार आहे. फक्त हे प्रबोधन फार मोठ्या प्रमाणात व्यापक, विश्वव्यापी व्हायला हवे. त्यासाठी स्वामी विवेकानान्दासारखी योगी पुरुषे प्रत्येक मानवी मनात उगवायला हवेत. कि ज्य्गोगे या विश्वाचे काळ्या होईल.
पसायदानातील द्यानेश्वराची विश्वव्यापकता, विश्व काल्यानासाठीची तळमळ, तगमग, व्याकुळता आपण समजून घेऊन उमजून वागायला हावे. हे १०-२० वर्षाचे नव्हे तर युगप्रवर्तक कार्य आहे. त्यासाठी आपण सज्ज आहोत. झोपायचे नाही राजा, रात्र वैर्याची आहे. वाईट प्रवृत्ती दुख धरून बसल्या आहेत. त्या दृष्ट प्रवृत्ती सदवृत्तीत प्रवार्तीत्ल व्हायला हव्यात. मानव्याचा उद्धार कार्याचा आहे. समाजमन घडवायचे आहे. सामंजस्य प्रस्तापित कार्याचे आहे. तेही एका घरात नव्हे तर विश्वरूपी कुटुंबात.
चला तर लागू कामाला……….