................निसर्ग : माझ्या मनातील................
नैसर्गिकता ही परमेश्वराने माणसाला दिलेली सर्वोत्तम देणगी आहे. ही नैसर्गीकता निसर्गात खच्चून भरलेली असते. हा निसर्गाचा असलेला अंगीक्रुत गुण मला फार आवडतो. ना वशिला ना लग्गा, ना ओळख ना पाळख. नैसर्गिकपणे व्यक्त व्हा, त्याचं फळ तुम्हाला मिळेल. हेच निसर्ग आपणास सांगतो. निसर्गातलं पाणी आपणाला सांगतं, प्रवाही रहा. म्हणून आपल्या आयुष्याला जीवन म्हणतात. जीवन म्हणजे पाणी. म्हणजेच प्रवाही. थांबला तो संपला. सारखा काळ चालला पुढे. काळाबरोबर नैसरगिकरीत्या आपली पावलं पडली पाहिजेत, हे निसर्गातील पाणी आपल्याला शिकवतं. प्रवाही पाणी थांबलं तर काय होईल? डबकं होईल त्याचं. दुर्गंधी येईल त्याला . त्यावर मच्छर बसतील अन रोगराई पसरेल. हे आपल्याला निसर्गापासून शिकायला मिळतं. कुठं थांबावं कुठं कोसळावं हेही पाण्यापासुन शिकावं. धरणात थांबावं, धबधब्यात ओसंडून वहावं. पशुपक्षी पहा, पिकलेलीच फळं खातील. पोपट पिकलेलाच पेरू खाईल. निसर्गाला त्याची स्वताहाची एक नैसर्गिक लय आहे, ताल आहे.निसर्ग प्रवाही आहे पण त्याला घाई नाही. He takes his own time. तो कधीच घाई करत नाही. आपल्यालाच खूप घाई असते. अति घाई म्हसणात नेई या नात्याने मग अपघात होतात. त्याला आपण जबाबदार असतो आणि म्हणताना म्हणतो की निसर्गाची अवक्रुपा झाली. म्हणून आपण निसर्गाला मित्र करून घेतलं पाहीजे. त्यासाठी निसर्गात गेलं पाहीजे. त्याच्या अंगाखांद्यावर खेळलं पाहिजे. माया लावली पाहीजे. मग बघा तो कसा देतो भरभरून तुम्हाला की ते ठेवायला जागाही पुरणार नाही आणि मनही भरणार नाही.फळे नैसर्गिकपणे पिकू द्या. त्याला जबरदस्तीने, रसायनांच्या मदतीने पिकवू नका. त्याला चव नाही येणार. क्रुत्रीमरीत्या पिकवलेला आंबा व पाडाचा आंबा, जमिन अस्मानाचा फरक असतो. म्हणजेच निसर्ग आपल्याला सांगतो की बाळंतपण सुद्धा नैसर्गिक होवू द्या. बाळंतपणाच्या वेदना नकोत म्हणून सिझरींग करणं अनैसर्गिक आहे. त्याचे परीणाम आयुष्यभर भोगावे लागतात. निसर्ग सांगतो आनंदी रहा, हसत रहा. नैसर्गिक रहा. झर्यासारखं खळखळत रहा. धबधब्यासारखं ओसंडून वहा. कोकीळेची तान जीवनात भरा. पाखरासारखं स्वच्छंदी रहा. पण लक्षात कोण घेतो ? आपल्याला वेळच नाही. आपण तसं वागतो का हे आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. चला करू निसर्गाशी मैत्री
अन मिळवू आनंदसंपत्ती.
No comments:
Post a Comment