Monday, 5 March 2018

संतांची सामाजिक फलश्रुती

••• संतांची सामाजिक फलश्रुती •••

परमेश्वर भावाचा भुकेला आहे . त्याला भौतिक गोष्टीमध्ये विशेष रस नाही . मनापासून केलेली प्रत्येक गोष्ट त्याला आवडते. तो त्यात रममाण होतो. त्याची भक्ती कशी करावी ? त्यासाठी संत रामदासांनी नवविधा भक्ती सांगितल्या आहेत.त्यातही कीर्तनभक्ती बहुश्रुत व आनंददायी  आहे. भगवंत हि स्वतः त्यात रममाण होतात.
तर अश्या या भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी किव्हा त्याच्या ठायी आपण विसावण्यासाठी काय काय करायला हवे हे आपल्या सर्व संतश्रेष्टानी सांगितल आहे. सर्व संतजनानी मानवजातीला अगदी भरभरून दिल आहे. त्याची उतराई होणे शक्यच नाही. त्याची फलश्रुती फार महत्वाची आहे. मानव्य म्हणजे काय , हे त्यांनी समस्त मानवांना समजावले. सकळ जनास शहाणे करून सोडले. त्यामागची समाजोद्धाराची ती तळमळ, तगमग सर्वश्रुत आहेच. त्यासाठी त्यांना कितीतरी हालअपेष्टाना सामोरे जावे लागले. पण ते डगमगले नाहीत. कावडीतले पाणी एकनाथांनी गाढवाला पाजले., एकनाथांची नदीची वारंवार केलेली अंघोळ. ज्ञानेश्वरांना झालेला त्रास. मीराबाईला झालेला त्रास .इत्यादी अनेक उदाहरणे देता येतील.
सगुण, निर्गुण, परमेश्वर, आत्मा, सत्य, असत्य, देह, भक्ती, योग, समाधी, आनंद, निराकार, मूर्त, अमूर्त इत्त्यादी इत्त्यादी . हे सर्व जीवन जगताना कसे अनुभावावे, हे संतानी शिकवले. समाजप्रबोधनाचे महत्वाचे काम या संतानी केलेले आहे. संत रामदास स्वामिनी तर अगदी बारीक सारीक गोष्टीवर सुद्धा भाष्य केले आहे. तेही अगदी सोप्यातल्या सोप्या भाषेत. त्यांचे मनाचे श्लोक, दासबोध, हे तर माणसाने जीवन कसे जगावे, हे सांगणारी दीपिकाच आहे. ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण, गीता हे जीवनाचे  मार्गदर्शक ग्रंथ आहेत. अगदी थोडक्यात सांगायचे म्हणजे एक तरी ओवी अनुभवावी हे दस्तुरखुद्द ज्ञानेश्वरांनीच सांगून ठेवले आहे. थोडक्यात काय तर सारांश असा कि व्रत वैकल्ये किव्हा कर्म कांडाच्या मागे जास्त न लागता संतानी सांगितलेल्या फलश्रुतीनुसार त्यांचा उपदेश आपल्याला आचरणात आणायचा आहे. तर मग आपणाला त्याचे फळ मिळाल्याचे समाधान लाभणार आहे. पूजा अर्चा व इतर सर्व गोष्टी आवश्यक आहेत पण ती साधने आहेत. आपल्याला अत्युच्य आनंदापर्यंत पोहोचायच आहे. म्हणजेच परमेश्वर प्राप्ती करायची आहे. त्या साधनाना जास्त कवटाळून बसण्याचे कारण नाही. साधन साध्य होता कामा नये. त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे किव्हा आपल्या आनंदाप्रत पोहोचण्याच्या त्या पायऱ्या आहेत. आणि पायऱ्या म्हणजे परमेश्वर नव्हे. याची आपण नोंद घेतली पाहिजे.
या सर्व संतानी भरीव असे सामिजिक कार्य करून ठेवले आहे. तो वारसा आपणाला पुढे चालवायचा आहे. तो हि आपल्याच म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी , आनंदासाठी. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात सांगितल्याप्रमाणे हे विश्वची माझे घर, ही उक्ती आपले ब्रीदवाक्य व्हायला हवे. संतानी याला मंत्राची ताकद दिली. त्यामुळे हे विश्व एकजीव होणार आहे. या जगतात बंधू भाव नित्य वासू दे . दे वरची असा दे. ही उक्ती खरी करून दाखवायची आहे. संतांचे कार्य पुढे चालू ठेवायचे असेल तर हेच आपले ध्येय व्हायला हवे. कारण यातच संपूर्ण मानवजातीचे कल्याण आहे. हीच संतांची सामाजिक फलश्रुती आहे. यासाठी आपण झटायचे आहे.
संत मीराबाईची कृष्णभक्ती पतीपत्नीत यायला हवी. एकनाथांची पशुदया आपल्या अंगात मुरायला हवी. असे असेल तर परमेश्वर आपल्याला फार मोठी शक्ती देतो. उर्जा देतो. हे सर्व अगदी वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता येत नाही पण त्याची अनुभूती नक्की येते. तुकारामांच्या अभंगातून प्रेरणा घ्यावी. ज्ञानेश्वरी व पसायदानातून सगुण, निर्गुण धर्म, वसुधा एव कुटुंबकम  इत्त्यादी जाणून घ्यावे. नामदेव, रामदास, कबीर , चोखा मेळा, एकनाथ, तुकाराम, मीराबाई, बहिणाबाई या सर्व संतांच्या मंदियाळीतून आपणाला खूप काही घ्यायचे आहे, शिकायचे आहे व आचरणात आणायचे आहे. हे सर्व घेत घेत आपणही दुसऱ्याला तेच परत देत जायचे आहे. म्हणतात न ....देणाऱ्याने देत जावे , घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देनाराच्ये हात घ्यावे. म्हणजेच दातृत्व घ्यावे.आपली संस्कृती खूप खूप संपन्न आहे. पुराने, ग्रंथ, वेद, यातून घुप घेण्यासारखे आहे. त्याचा प्रसार व प्रचार व्हायला हवा.
हे यासाठी आवश्यक आहे कि काल फार झपाट्याने बदलत आहे. अनिस्था प्रवृत्ती, दहशतवाद, गुंडगिरी, दादागिरी, भ्रस्टाचार चांदल्च मुल घृ पाहत आहे. न्याय दडून बसत आहे आणि अन्याय उघड्या छातीने सर्रास चोहोकडे फिरता आहे.अक्षर्धान्म जळत आहे. संसद द्हाशातीमध्ये वावरत आहे. या सर्व अनिष्ठ गोष्टी पूर्ण विशावला कवेत घेऊ पाहत आहे. त्यावर प्रबोधन हेच औषध आहे. कि जे संतानी आपणाला दिले आहे. हे फार मोठे व पवित्र कार्य आपणास हाती घेवून तडीस न्यायचे आहे. हा महायज्ञ आहे. सज्जनहो, विचार करा. आपण सर्वांनी खारीचा का होयीना पण वाट या कामात उचाल्याचा आहे.
साहित्यिकांनी साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन करावे. प्रवचनं कीर्तन, अभंग, भजन व्य्ख्यान, निरुपण, काव्य, लेख, कथा, चित्रपट, नात्याक, भाषण, वक्तृत्व, पोवाडा, गाणें इत्त्यादी अनेकविध माद्यमातून हे कार्य करायचे आहे.समाज्माने आपल्याला जिंकायची आहेत, समाजमन तयार करायचे आहे. लोकांची माने जिंकताना ते नाराज होणार नाहीत याचीही काळजी ज्ञायाची आहे. यांच्या मनातील वाक्रपणा घालवायचा आहे. मूलतः ते चान्लेच आहेत, व ते आपल्याच कुटुंबाचे सदस्य आहे. संतांच्या शिकवणीचे आचरण मनन चिंतन, आपल्याला करायचे आहे.
ज्ञानेश्वर, मुक्ती, तुकाराम, रामदास, सोपान, कबीर, जनी, बहिणाबाई, नमदेओ इत्त्यादी, संतानी सत्कार्यारूपी मंदिर बांधून ठेवले आहे. त्याचे जतन करायची जबाबदारी आपल्यावर आहे. टी आपल्याला निभवायची आहे .त्यासाठी डोळ्यात टेल घालून आपण सज्ज राहायला हवे. अनुबंब, रासायनिक बोंब , क्षेपणास्त्रे, यांच्यैताकीच मानवी मनेही वाईट झाली आहेत. टी वाईट माने आपल्याला बदलायची आहेत. वालावायाची आहेत, चांगली कार्यायाची आहेत. कि ज्यायोगे अनु उर्जेचा उपयोग मानवाच्या आनंदासाठी म्हणजे वीजनिर्मिती, औशादानिर्मिती इत्त्यादी सत्कार्याबद्दल करतील. हा मुलभूत बदल प्रत्येक मानवी मनात करायचा आहे. तो प्रबोधनातून होणार आहे. फक्त हे प्रबोधन फार मोठ्या प्रमाणात व्यापक, विश्वव्यापी व्हायला हवे. त्यासाठी स्वामी विवेकानान्दासारखी योगी पुरुषे प्रत्येक मानवी मनात उगवायला हवेत. कि ज्य्गोगे या विश्वाचे काळ्या होईल.
पसायदानातील द्यानेश्वराची विश्वव्यापकता, विश्व काल्यानासाठीची तळमळ, तगमग, व्याकुळता आपण समजून घेऊन उमजून वागायला हावे. हे १०-२० वर्षाचे नव्हे तर युगप्रवर्तक कार्य आहे. त्यासाठी आपण सज्ज आहोत. झोपायचे नाही राजा, रात्र वैर्याची आहे. वाईट प्रवृत्ती दुख धरून बसल्या आहेत. त्या दृष्ट प्रवृत्ती सदवृत्तीत प्रवार्तीत्ल व्हायला हव्यात. मानव्याचा उद्धार कार्याचा आहे. समाजमन घडवायचे आहे. सामंजस्य प्रस्तापित कार्याचे आहे. तेही एका घरात नव्हे तर विश्वरूपी कुटुंबात.
चला तर लागू कामाला……….

सोशल मेडीया

सोशल मेडीया च्या धामधुमीत
वाचन क्षमतेची स्थिती..................
=====••=======••=====

सोशल मेडीया हे प्रसार आणि प्रचाराचे प्रभावी माध्यम आहे यात शंकाच नाही. या आधुनिक तंत्रज्ञानाचा ऊपयोग आपण करुन घ्यायलाच हवा. ब्लॉग, फेसबुक, ई बुक, ई पेज, किंडल, वॉटसप, ट्विटर , गुगल, यु ट्युब ईत्यादींच्या द्वारे आपण सोशल मेडीयाचा वापर वाचनासाठी करतो.
आता आपला प्रश्न आहे की या सर्व सोशल मेडीयाचा वापराने आपली वाचनक्षमता कमी झाली आहे का?
वाचन आपण कोणत्याही गोष्टीचा वापर करून करू शकतो. त्यासाठी पुस्तकच वापरलं पाहीजे असं काहीच नाही. ज्ञान संपादन करण्यासाठीचे डोळे हे ज्ञानेंद्रीय आहे. त्याचा
साधन म्हणून आपण वापर करतो व वरील सर्व ठीकाणी वाचन मजकूर असतो तो आपण वाचतो. त्यामुळ् हा मुद्दा क्रीस्टल क्लीअर आहे.
त्यात काहीच वावगं नाही. ऊलटपक्षी या गोष्टीमुळे आपणास हवे ते हवे तेंव्हा हव्या त्या स्वरूपात सहज ऊपलब्ध होते.
वाचन कसं करतो कोठुन करतो हा मुद्दा नाही तर मुद्दा हा आहे की सोशल मेडीयाच्या धामधुमीत वाचन क्षमता कमी होत आहे का?
वरील सर्व वाचनाच्या , ऐकण्याच्या , लिहीण्याच्या , त्वरीत रिस्पॉन्स देण्याच्या ईंन्स्टंट प्रकारामुळे पुर्वीसारखे शांत चित्ताने , आत्मचिंतन करीत, विचाराचे मंथन करीत, चर्वण करीत वाचन होत नाही. त्यामुळे वाचन व्यवस्थित होत नाही. वाचनाला न्याय दिला जात नाही. त्यावर चिंतन होत नाही. मन वरील सर्व प्रकारात गुंतते. आणि मग एक ना धड भाराभर चिंध्या असा प्रकार होतो. विविध प्रकारच्या साहीत्यिक स्पर्धा जशा की निबंध, लेख, कविता, नाटक, एकांकीका, वात्रटीका, चारोळी, गझल आत्यादी अनेकानेक ईंन्स्टंट प्रकार अॉनलाईन चालु असतात. पळा पळा कोण पुढे पळे तो असा सर्व प्रकार होवून जातो.
या द्रुष्टीकोनातून पाहील्यास आपणास असे निच्छितपणे म्हणता येईल की होय खरं आहे
 वाचन क्षमता कमी होत आहे. सोशल मेडीयाच्या त्या ईन्स्टंट जंजाळात जास्त गुरफटून न जाता सात्विक वाचन केले, त्यावर चिंतनपर लिहीले तर लिखाणात , विचारात व अर्थातच आचारात सकसता येयील. वाचनाची क्षमता यात योग्य , सात्विक, चिंतनशील, विनोदी, मन प्रसन्न करणारं, व्यक्तिमत्व घडविणारं वाचन अभिप्रेत आहे किंवा असावं. त्यासाठी वेळ हवा. घिसाडघाई काही कामाची नाही. चांगुलपणात तडजोड नसावी. हे कटू असलं तरी स्त्य आहे. म्हणून टिकावू आहे. यावर ऊपाय म्हणजे वाचन अविरत, सातत्याने करावे. त्यामुळे विचारसरणी विकसीत होते. सोशल मेडीयाचा वापर मर्यादीत, हवा तेवढा, हवा तेथेच करावा. त्याच्या आहारी जावू नये.
एवढं कटाक्षान् , पथ्य म्हणून पाळले तर वाचन क्षमता वाढेल. ते सद्या होताना दिसत नाही. म्हणून ती कमी होत चालली आहे. अर्ध्या हळकुंडात पिवळं होण्याच्या मोहात लोक अडकत चालले आहेत. हे ईष्ट नाही. हानीकारक आहे. असो तर आज सोशल मेडीयाच्या धामधुमीत वाचनक्षमता कमी होत चालली आहे हे सत्य आहे पण ते हानीकारक आहे हे मला आग्रहाने सांगावेसे वाटते. वाचनक्षमता वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू यात.

जातीय द्वेषावर साहित्यिकांचा सहभाग

......जातीय द्वेषावर साहित्यिकांचा सहभाग ......

मला प्रांजळपणे असे वाटते की जातीय द्वेषावर साहित्यिकांचा सहभाग खालील मुद्द्यावर आधारीत असावा.

0. नीतीमुल्यावर आधारीत असावा.

शेवटी आपण ज्या समाजाचे अविभाज्य घटक आहोत तो समाज सुद्रुढ रहायला नको का? तो शरीराने आणि मनानेही सशक्त सुद्रूढ व निरोगी असायला हवा. पैकी मानसिकता बनविण्याचे महत्वाचे कार्य समाजातील साहित्यिकाचे आहे. प्रत्येक समाजात, धर्मात जाती पाती या असणारच. ती ज्यांची त्यांची जीवन पद्धती आहे व त्याप्रमाणे जीवन जगण्याचा त्याना पूर्ण अधिकार आहे. त्यात जातीजातीमधे द्वेष करण्याचे काहीच कारण नाही. ऊलट प्रत्येकानी दुसर्या जातीचा मान व आदर राखला पाहीजे. समाजात खेळीमेळीने राहीले पाहीजे.
हे सर्व करणं अर्थात जातीय सलोखा ठेवणं साहित्यिकानी करावं . कारण साहित्यिक हा सर्व जातीपातीच्या परे असतो. म्हणूनच त्याला साहित्यिक म्हणतात. ही बिरूदावली वापरायची असेल तर जातीय सलोखा टीकवून ठेवणं हे त्याचं आद्य कर्तव्य आहे. ते तो करीतही आहे पण त्याची तीव्रता कमी पडते किंवा त्यांची लेखणी या सामाजिक कार्यात कमी चालते त्यामुळे प्रबोधन कमी होते आहे असे म्हणावे लागेल. कारण जातीय दंगली कमी होत नाहीत. याची क्रुपया सर्व साहित्यिकानी नोंद घ्यावी अशी मी त्याना नम्र प्रार्थना करतो कि ज्यायोगे नितीमुल्ये जोपासली जातील.

0. जातीय द्वेष न भडकता सलोखा प्रस्थापीत करणे.

प्रत्येक साहित्यिकानी आपल्या सहकार्यावर लक्ष ठेवावे व जातीय द्वेष भडकविणाच चुकुनही क्रुत्य होणार नाही तसे काही लिखाण होणार नाही याची दक्षता घ्यावी. द्वेष हा आपला षडरीपूपैकी एक रीपू म्हणजे शत्रू आहे. त्याचा वेळीच बंदोबस्त व्हायला हवा अन्यथा याचं कधी वणव्यात रूपांतर झालं हे कळणारही नाही. म्हणून साहित्यिक राजा जागा हो रात्र वैर्याची आहे.

0. समाजमनावर सकारात्मक परीणाम करणे.

साहित्य हे समाजाचं करमणुकीचं व प्रबोधनाचं प्रभावी साधन आहे. ते शस्त्रासारखं आहे आणि हे शस्त्र साहित्यिकाच्या हाती असतं. हे कसं सकारात्मक परीणामासाठी वापरायचं ही महत्वाची जबाबदारी साहित्यिकांची आहे. हे कसब त्यांच्या प्रत्येक साहित्य प्रकारात ऊतरावे. ही त्यांची सामाजिक बांधीलकी आहे. नाटक, सिनेमा, दूरदर्शन, वर्तमानपत्रे, वॉटसप, ईंटरनेट, फेलबूक, ट्वीटर ईत्यादी विविध माध्यमातून साहित्यिकानी त्यांचे मत सकारात्मक पद्धतीनेच मांडताहेत ना याची वेळोवेळी खातरजमा करावी व त्यावर अगदी आग्रही असावे.

0. साहित्यिकानी मार्गदर्शक, आग्रही, मनस्वी असावे.

साहित्यिकाचे समाजातील स्थान फार महत्वाचे आहे. समाजमनाचा ठाव घेणारं आहे. समाज त्यांचं मनापासून ऐकतो कारण नाही म्टलं तरी खरंच साहितियिक हा समाजमनावर काज्य करणारा सम्राटच असतो. तो समाजात त्याच्या लेखणीतून डोकावतो. समाजमनाला कुरवाळतो व खडसावतोही. तो आग्रही असतो. समाजाचं मार्गदर्शन करतो. तो हे सगळं अगदी मनापासून करतो म्हणूनच तर तो समाजाचा गळ्यातला ताईत असतो.अशा समाजाप्रती त्याने क्रूतज्ञता ठेवणं व या माध्यमातून जातीजातीत सलोखा ठेवणं अत्यंत आगत्याचं आहे.

0. प्रक्षोभक, अरेरावीपणा, गलीच्छ , भडक, द्वेषपूर्ण साहित्य टाळावे ( काही अपवाद तेही चांगल्या परीणामासाठी)

काही सात्यिकाना ही सवय असते. त्याना हे कळत नाही की एका जातीवर अनुकूल भडकावू लिखाण केल्यानं दूसरी जात त्याच्यावर नाराज होणार आहे.मग त्याला पाठींबा म्हणून दूसरा साहित्यिक तसाच लिहीतो. तिसरा त्याचा विरोधात लिहीतो. हे असे सारे लिहीणारे समाजकंटक आहे. विकावू साहित्यिक आहेत याची खूणगाठ समाजातील प्त्येकजणानी बांधून ठेवण्याची गरज आहे. कडक, भडक, क्रांतीकारी आवश्य लिहावे पण त्याचा आपेक्षित परीणाम चांगल्यासाठी असेल तरच. जसे की पोवाडा, क्रांतीगीत, समरगीत, अन्यायाविरूद्ध ऊठव करणारी गीते कविता, नाटके, धारावाहीके ईत्यादी की ज्यामुळे अनिष्ट रूढी परंपरा, जातीय द्वेष समाजातून ऊखडून बाहेर फेकले जातील.

0. वाचकाची नस पकडता आली पाहीजे.

वाचकाना पटेल, रूचेल , ऊमगेल अशा पद्धतीचे लिखाण करावं.


वास्तवाचं भान ठेवून, समाजमनाची नस ओळखून लिखाण केलं तर लोक जातीपाती विसरून एक होतील. जातीय सलोखा निर्माण होईल. आणि अगदी हेच साहित्यिकाकडून आपे़क्षित आहे. समाजाप्रती हे त्यांचं देणं आहे. हे समाजरूण त्यानी फेडलं तर त्यांच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही.

असो तर जातीपातीच्या परे जावून आपण आपल्या सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून लिखाण केलं तरच आपण समाजाप्रती क्रुतज्ञ राहूत आणि राहणारच आहोत अशी ग्वाही देऊन ईथे मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.

प्रेम: काल आज आणि ऊद्या

 ........प्रेम:  काल आज आणि ऊद्या ........

कालचे प्रेम पूर्णपणे त्यागमयी होते. त्यात वासनेचा वास नव्हता. ऊदात्त प्रेम होते ते. हिर रांझा, नल दमयंती या जोड्या प्रातिनिधीक स्वरूपात कालचं प्रेम म्हणून ऊल्लेखिता येतील. त्यागावर आधारीत प्रेम. अर्थातच ऊदात्त प्रेम. आत्मिक प्रेमही म्हणता येयील त्यास. एका आत्म्याचं दुसर्या आत्म्यावर असणारं निस्सीम प्रेम. यात मदन महत्वाचा नव्हता. शरीर महत्वाचं नव्हतं. म्हणजेच आपणास असंही म्हणता येईल की द्वैताचं अद्वैतात रूपांतर.

आजचं प्रेम सर्वश्रूत आहेच. आपण दैनंदीन ऊघड्या डोळ्यानी ते पाहतो. अंतर्मुख होवून सदसदविवेक बुद्धी वापरून विचार कोला तर चित्र स्पष्ट दिसते. पूर्वीसारखं प्रेम राहीलं नाही. हे आपल्या बोलण्यात येतं अर्थातच आपण सर्व स्तरावरचं प्रेम ग्रुहीत धरतो आहे. प्रेमापेक्षा पैसा जास्त जवळचा होवू पहात आहे.नाती दुरावत आहेत. प्रेम कमी होत आहे. पैसा प्रेमाची जागा घेवू पहात आहे.मर्यादा पुरुषोत्तम राम लक्ष्मण भरताचं कालचं प्रेम कुठं गेलं? राम सीता, ऊर्मिला लक्ष्मणाचं प्रेम कुठं गेलं? हरवलं ते प्रेम. आध्यात्मिक प्रेमाची जागा भौतिक प्रेमाने जवळपास घेतलेलीच आहे.
हे कसं झालं कळायच्या आत ऊद्याचं अत्याधुनिक प्रेम ऊंबर्यावर आहे आपल्या घरातच नाही तर मनात ह्रुदयात ठाण मांडून बसायला तयारच आहे.

ते असेल ऊद्याचं प्रेम. जे आपण अमेरीकेसारख्या देशात आजही पाहतो. जन्म ेणं आईचं काम. त्यानंतर संबंध नाही. पशुसारखं. म्हणजेच नात्यातली पाशवी व्रुत्ती. नवरा बायको म्हणजे नर मादी. संभोग म्हणजेच प्रेम ही नवीन व्याख्या ऊद्याच्या प्रेमाची असेल.आत्मिक प्रेम ही बुरसटलेल्या विचारांची प्रेमप्रणाली लयास जाईल. लीव्ह ईन रीलेशनशीप ही पद्धत तर चालू झालेलीच आहे. त्याचा परमोच्च बिंदू ऊद्याच्या प्रेमात पहायला मिळेल. अशी लीव्ह ईन रीलेशनशीप कॉन्ट्रेक्टस हळू हळू कमी कालावधीसाठीच असतील कारण ती जास्त टीकणारच नाहीत.
आणि याला ते आधुनिकता म्हणतील.

थोडक्यात सांगायचं म्हणजे कुठे तो एकवचनी, एकबाणी, एकपत्नी राम, भरताचं बंभूप्रेम, दशरथाचं प्रजाप्रेम, ऊर्मिलेचं सीतेचं पतीप्रेम अन कुठेआजचंबेगडीलव्हईनरीलेशनशीपमधलं प्रेम? ऊद्याच्या प्रेमाची तर कल्पनाच करवत नाही. कलीयुगाचा महीमा . दुसरं काय? भौतिकतेकडून आध्यात्मिकतेकडे हा विचारप्रवाह वळला तर सोन्याहून पिवळे अन्यथा ऊपभोगवाद बळावून त्यातच होरपळून जाणं नशीबी येईल येवढं मात्र आवर्जून सांगावसं वाटतं. संस्काराय नम:

विचार : स्थिर व अस्थिरतेचा

......... विचार : स्थिर व अस्थिरतेचा .......

   आज मनुष्य कधी नव्हे इतका अस्थिर बनत चालला आहे. सर्व सुखे पायाशी लोळण घेत असताना देखील, तो खऱ्या सुखापासून मनःशांतीपासून कोसो दूर आहे. भौतिक सुविधा वाढल्या आहेत पण त्याची दुःखे अजूनच वाढत चालली आहेत.  रोज नव्या अडचणी , नवे प्रश्न , नवी आव्हाने यामुळे अनेक प्रकारच्या चिंता , तणाव याने तो घेरलेला आहे . विज्ञानाने तो आर्थिक व भौतिक दृष्ट्या जरी स्थिर झाला असला तरी त्याचे शारीरिक श्रम कमी झाले पण मानसिक पातळीवर तो अधिकाधिक कमकुवत बनु लागला आहे.
  रोजमर्राच्या  समस्या तर वाढल्या आहेतच पण छोटे छोटे issues देखिल त्याला कमकुवत बनवून त्याचे स्वास्थ्य हिरावून घेत आहेत.
असे का? कशामुळे? थोडा विचार करू यात.
माणूस जसजसा निसर्गापासून दूर चालला आहे , तसतसा तो अधिक अस्थिर होऊ लागला आहे . आज पुन्हा सामाजिक व आर्थिक विषमता डोके वर काढू लागली आहे तथाकथित अवैचारिक विध्वंसक शक्तींना मोकळे रान मिळत आहे की काय अशी स्थिती निर्माण होत आहे . भ्रष्ट व्यवस्थेला चालना मिळत असल्याने सामाजिक स्तरावर त्याचे दुष्परिणामच दिसून येतात . अनेक दुर्गुणांची जोपासना होत आहे. ते सद्गुण असल्याचा भास निर्माण केला जात आहे. भ्रष्टाचाराला, अनीतीला, दुर्गुणाला प्रतिष्ठा लाभत आहे. हे सर्व करणारे दुसरे तिसरे कोणी नसून आपल्यातलेच ईंग्रज आहेत. बाह्य ईंग्रज घालवले पण आतले ईंग्रज अजून तळ ठोकून आहेत. कुणाच्या बापाचं ऐकत नाहीत. ते सर्व माणसाला रसातळालाच नेत आहेंत. एका बाजूला मॉल ,इमारती ,कॉर्पोरेट एरिया तर दुसऱ्या बाजूला भीषण दारिद्र्य , झोपडपट्ट्या , गलिच्छ अस्वच्छ वातावरण. याचा सुवर्णमध्य साधता आला तर मग त्याला रामराज्यच म्हणू यात. पण घोडं कुठं पेंड खातय ते शोधणं प्रामुख्यानं गरजेचं आहे.
सद्याची स्थिती अशी आहे.
देश पुढे जाण्याऐवजी मागेच येत आहे की काय असे वाटते. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे . कर्जबाजारीपणा , जमिनीचा नापिकपणा , नैसर्गिक आपत्ती , उत्पन्नातील घट , शेतमालाला भाव न मिळणे यासारख्या अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे.
 खऱ्या अर्थाने या आधुनिक युगात वावरताना आपण कितपत विकसित झालो आहोत? खऱ्या अर्थाने आपण वैचारिक दृष्ट्या किती सुसंपन्न झालो आहोत ? प्रगत तंत्रज्ञान , आधुनिक जीवनशैलीं ने आपले खरेच कल्याण झाले आहे का ? आपण सुखी झालो आहोत का हा मोठा प्रश्नच आहे
 दिवसेंदिवस वाढणारी तणावग्रस्तता , चिंता , परस्पर संबंधातील कटुता ही आधुनिक युगाची मोठी देन आहे.

आता महत्वाच्या विषयाबद्दल म्हणजेच जीवनाच्या साराबद्दल विचार करू यात.

निसर्गात स्वतःची अशी एक स्थिरता आहे की जी आपल्याही तनामनात वास करून आहे . कारण आपण निसर्गाचाच एक अंश आहोत. असे असले तरी आपल्या आगाऊपणामुळे ह्या स्थिरतेपासून खरे तर आपण दूर चाललो आहोत . त्यामुळे विभिन्न विकृत समस्यांच्या जाळ्यात आपण अडकत आहोत.
   बारकाईने निरीक्षण केल्यास ह्या सृष्टीचा निसर्गाचा स्वतःचा असा एक ताल आहे , स्वतःचे असे एक नृत्य आहे , संगीत आहे.
 सृष्टीचे हे एक अगाध असे रहस्य आहे . सृष्टीत जी स्थिरता व्यापून आहे ती निसर्गात गेल्यावरच आपल्यात उमलते.
नीट लक्षात घ्या , अस्थिरतेनेच आपली कामे बिघडतात . पण स्थिरता ही कामना जुळवून आणते.  स्थिरता ही आपल्याला असंभव वाटणारी , पण मुळात ती संभव असतात अशीच कामे घडवून आणते. ती आपला आवाका अचूक जाणते. त्यानुळे ती आपल्याला आततायीपणाकडे जावू देत नाही. निसर्गाचा तोल सांभाळून त्यास समतोस ठेवण्याचा प्रयत्न करते. समोर ठाकलेल्या चिंता , अडचणी यातून सहीसलामत बाहेर पडण्याचा मार्ग स्थिरताच दाखवते.  स्थिरता आपल्यातच एखाद्या समस्येचे मुळ शोधण्यास मदत करते किंवा त्या समस्याच गायब करून टाकते.
   आज उभी असणारी अनेक आव्हाने , प्रश्न याची उत्तरे कुठे बाहेर शोधण्याची गरज नाहीये तर ती आपल्या स्थिर मनोवृत्तीतच आढळून येतात. हे खरे निसर्गाचे रहस्य आहे. हे आपण जाणून घेतले पाहीजे.
   स्थिरता ही सर्व प्रकारच्या आंतर व बाह्य गोंधळाला संपुष्टात आणते . आपल्याला शारिरीक व मानसिक दृष्ट्या स्थिर व्हावे लागणार आहे जी आपली प्राचीन परंपरा आहे.
आत्मिक दृष्ट्या जेव्हा आपण स्थिर होऊ लागतो तेव्हा आपल्या जीवनाला खरे वैभव प्राप्त होते. तो आपल्या जीवनाचा सुवर्णकाळ असतो.
     मानवाचे खरे कल्याण ह्या स्थिरतेत आहे. स्थिरता ही निसर्गाची मूळ अवस्था आहे. त्यामुळे निसर्गाची रचना कधीही डळमळीत होत नाही.
  अस्थिर मन हेच अनेक अपयशाचे कारण आहे. स्थिर मनाने घेतलेले निर्णय हे नेहमी यशकडेच घेऊन जातात. अस्थिरतेत अपयश निश्चित आहे. चिडचिड, मनस्ताप आहे.
  स्थिरतेचा हा ध्यास मानवाला त्याच्या कल्याणाकडे , खऱ्या वैभवाकडे घेऊन जाणारा आहे. प्रश्न हा आहे की हे सर्व आपण समजून ऊमजून घेणार का? आणि समजून घेतले तरी आचरणात आणणार का?
बघू यात, आपणच आपल्या जीवनाचे अर्थातच मानसिकतेचे शिल्पकार आहोत.
शुभस्य शिघ्रम ! शुभम भवतु !!

खेळ कुणाला दैवाचा कळला?

...........खेळ कुणाला दैवाचा कळला?...........

दैव !!! दैव जाणीले कुणी? मुळात दैव म्हणजे काय ? ते कुणी बघीतलय ? त्यावर का बरं विश्वास ठेवायचा? असे अनेक प्रशन उठतात.
या सर्वांची शहानिशा करून मग आपण कुठलातरी निर्णयाप्रत येउ शकतो.
दैव म्हणजे नशीब. हे नशीब सटवी बाळाच्या कपाळावर लिहीते म्हणे की जे आपल्याला दिसत नाही. आणि त्याप्रमाणेच त्या व्यक्तीच्या आयुष्यात घटना घडत जातात. आपण निमित्तमात्र असतो. मग हे सर्व जर आधीच ठरलेलं असेल तर आपण स्वता हून काही करायची गरजच नाही ना. असं म्हणून चालेल का? नाही चालणार. हे जे दैव किंवा नशीब आहे ते मागील जन्माच्या पापपुण्याची गोळाबेरीज करून उरलेल्या पाप व पुण्यानुसार व मागील जीवनातील व्रुत्तीनुसार या जन्मासाठी केरी फॉरवर्ड केलेले असते.
आता परमेश्वराने आपल्या दैवाबरोबरच आपल्याला खूपशा सवलती/ फेसीलीटीज दिल्या आहेत की ज्या वापरून आपण काहीही करू शकतो. आपलं नशिबही बदलू शकतो. ते आपल्या कर्तुत्वावर अवलंबून आहे. एखाद्या बेंकेत आपली मागील शिल्लक पुढील वर्षासाठी केरी फॉरवर्ड करावी. व मेनेजरनी मागील वर्षातील व्यवहार पाहून याचं पुढील वर्ष कसं जाइल याचा एक लेखाजोखा लिहून ठेवलेला असतो. त्यालाच आपण आपल्या जीवनाच दैव म्हणतो. मग आता आपणास दैवाबाबतचा कल्पना मला वैयक्तीक वाटतात त्या स्पष्ट झाल्या असतील व मग आता आपण जीवन कसं जगायचं याचाही विचार झटकन आपल्या मनात आला असेल. दैवाचं जीवनातील स्थान किती व कसं आहे व त्यानुसार आपण त्याला किती व कितपत महत्व द्यायचं हेही लक्षात आलं असेल.
मग आता कळला ना दौवाचा खेळ काय असतो
नमस्कार.

निसर्ग माझ्या मनातील

................निसर्ग : माझ्या मनातील................

नैसर्गिकता ही परमेश्वराने माणसाला दिलेली सर्वोत्तम देणगी आहे. ही नैसर्गीकता निसर्गात खच्चून भरलेली असते. हा निसर्गाचा असलेला अंगीक्रुत गुण मला फार आवडतो. ना वशिला ना लग्गा, ना ओळख ना पाळख. नैसर्गिकपणे व्यक्त व्हा,  त्याचं फळ तुम्हाला मिळेल. हेच निसर्ग आपणास सांगतो. निसर्गातलं पाणी आपणाला सांगतं, प्रवाही रहा. म्हणून आपल्या आयुष्याला जीवन म्हणतात. जीवन म्हणजे पाणी. म्हणजेच प्रवाही. थांबला तो संपला. सारखा काळ चालला पुढे. काळाबरोबर नैसरगिकरीत्या आपली पावलं पडली पाहिजेत, हे निसर्गातील पाणी आपल्याला शिकवतं. प्रवाही पाणी थांबलं तर काय होईल? डबकं होईल त्याचं. दुर्गंधी येईल त्याला . त्यावर मच्छर बसतील अन रोगराई पसरेल. हे आपल्याला निसर्गापासून शिकायला मिळतं. कुठं थांबावं कुठं कोसळावं हेही पाण्यापासुन शिकावं. धरणात थांबावं, धबधब्यात ओसंडून वहावं. पशुपक्षी पहा, पिकलेलीच फळं खातील. पोपट पिकलेलाच पेरू खाईल. निसर्गाला त्याची स्वताहाची एक नैसर्गिक लय आहे, ताल आहे.निसर्ग प्रवाही आहे पण त्याला घाई नाही. He takes his own time. तो कधीच घाई करत नाही. आपल्यालाच खूप घाई असते. अति घाई म्हसणात नेई या नात्याने मग अपघात होतात. त्याला आपण जबाबदार असतो आणि म्हणताना म्हणतो की निसर्गाची अवक्रुपा झाली. म्हणून आपण निसर्गाला मित्र करून घेतलं पाहीजे. त्यासाठी निसर्गात गेलं पाहीजे. त्याच्या अंगाखांद्यावर खेळलं पाहिजे. माया लावली पाहीजे. मग बघा तो कसा देतो भरभरून तुम्हाला की ते ठेवायला जागाही पुरणार  नाही आणि मनही भरणार नाही.फळे नैसर्गिकपणे पिकू द्या. त्याला जबरदस्तीने, रसायनांच्या मदतीने पिकवू नका. त्याला चव नाही येणार. क्रुत्रीमरीत्या पिकवलेला आंबा व पाडाचा आंबा, जमिन अस्मानाचा फरक असतो. म्हणजेच निसर्ग आपल्याला सांगतो की बाळंतपण सुद्धा नैसर्गिक होवू द्या. बाळंतपणाच्या वेदना नकोत म्हणून सिझरींग करणं अनैसर्गिक आहे. त्याचे परीणाम आयुष्यभर भोगावे लागतात. निसर्ग सांगतो आनंदी रहा, हसत रहा. नैसर्गिक रहा. झर्यासारखं खळखळत रहा. धबधब्यासारखं ओसंडून वहा. कोकीळेची तान जीवनात भरा. पाखरासारखं स्वच्छंदी रहा. पण लक्षात कोण घेतो ? आपल्याला वेळच नाही. आपण तसं वागतो का हे आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. चला करू निसर्गाशी मैत्री
अन मिळवू आनंदसंपत्ती.

शिक्षण : विकासाचा पाया

शिक्षण : विकासाचा पाया.

ईग्नाईट पुरस्कार वितरण प्रसंगी मा. डा.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी व्यक्त केलेले मौलिक विचार असे, “ शिकण्याने निर्मितीक्षमता येते, निर्मितीक्षमतेने विचारशीलता प्रकट होते, विचारशिलतेने ज्ञान मिळते आणि ज्ञान तुम्हाला महान बनविते. रचनात्मकता + धर्मभाव + साहस = ज्ञान.”
भारताला ऋषीमुनींची परंपरा आहे. त्यांच्या ज्ञानाने आपली शिक्षण प्रणाली बनलेली आहे. भारतीय संस्कृती मोठा इतिहास घेवून आपल्या समोर मानसशास्त्राच्या भक्कम पायावर उभी आहे. मानवी मनाचा खूप मोठा विचार व संस्कार त्यात आहे. आपल्या संस्कृतीत फक्त व्यक्तीपुरता विचार अजिबात अभिप्रेत नाही. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. म्हणून समाजाचाही विचार त्यात आहे. फक्त समाजच नव्हे तर पूर्ण विश्वाचा विचार आहे. म्हणून तर आपल्या ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘हे विश्वची माझे घर.’
आपली संस्क्रूती विश्वाला घर मानणारी आहे. संस्कार शिक्षण प्रणालीतील फार महत्वाचा घटक आहे. संस्कारमय व्यक्ती घडविणे हाच शिक्षणाचा मुख्य हेतू आहे, शिक्षण हा विकासाचा पाया आहे, अशी आपली संस्कृती सांगते.
व्यक्ती, समाज, अवती भवतीचे वातावरण यावर संस्कार व शिक्षण अवलम्बून असते. मुळ पाया भक्कम भरून मग त्यावर विश्वव्यापकतेची इमारत उभी राहते. तो पाया आपण आपल्या आईच्या  भाषेत, त्या  संस्कारातच बांधला पाहिजे म्हणजे मग विकासाची गंगा अविरत घरोघरी पोहोचेल. जीवनासाठी शिक्षण असते , शिक्षणासाठी जीवन नव्हे.
भारतीय परंपरेत विज्ञान आणि तत्वज्ञान गच्च भरलेले, अतिप्राचीन आहे. ते ज्ञान जगभरातून कौतुकाने गौरविले जात आहे. हे ज्ञान ते लोक आपल्यापासून घेऊन जातात, नवीन आवरणात परत जगाला देतात. उदाहरण म्हणजे योग आपल्या भारतीय समाजरचनेचा आणि शिक्षणाचा अविभाज्य भाग होता. हे जगही मान्य करते.  शिक्षण हा समाजजीवनाचा आरसा असला पाहिजे. समाज घडविण्याचे, त्याचा विकास करण्याचे  काम शिक्षणाचे आहे. आपल्या संस्कृतीच्या आस्तीत्वासाठी शिक्षण घ्यायचे आहे.. त्यापासून कोणीही दूर राहू नये असे मला वाटते.
तक्षशीला व नालंदा सारखी विद्यापीठे ठीकठीकाणी  अस्तित्वात यावीत. ज्या जिद्दीच्या व इच्छाशक्तीच्या बळावर जपानने स्वतःचा कायापालट केला, त्याच पुंजीच्या आधारावर देश विकास करतात, हा शाश्वत सिद्धांत आहे. असा सिद्धांत स्वबोधानेच जगतो.
थोमास मन्रो नावाच्या एका ब्रिटीश अधिकाऱ्याने फार समर्पक विधान केले होते.
” इंग्लंड आणि भारत यांनी समजा, आपल्या व्यापारात संस्कृतीची आयात निर्यात करण्याचे ठरवले तर भारतातून संस्कृतीची आयात करणे इंग्लंडच्या फायद्याचे सिध्द होवील.”  किती बोलके, वास्तवाला धरून विधान आहे. कारण शिक्षण म्हणजेच संस्कार असे आपली भारतीय संस्कृती सांगते.
शिक्षण पायाभूत असावे म्हणजे विकास घडला जातो. अन्यथा मनुष्य आणि पशु यात फरक तो काय ? शिक्षणामुळे माणूस विचार करायला शिकतो आणि विचार केल्यावर आणखी शिक्षण घेतो. अशी ही श्रुखला अमर्याद सुरु राहते. यातून माणूस परिपूर्ण बनण्याची प्रक्रिया होते. माणूस स्व ला जाणतो आणि स्व ला जाणण्यासाठी जे शिक्षण ते खरे शिक्षण कि जे जीवनाचा विकास घडवते. कारण शिक्षण हाच विकासाचा पाया आहे.
ज्ञान वाढते आहे. कुठलीतरी श्रद्धा आवश्यक आहे आणि ही मानसिक आवस्था आहे. मनाशिवाय शरीर नाही तसे अध्यात्मिकतेशिवाय विज्ञान नाही. आत्मा आणि शरीर मिळून माणूस तयार होतो. हे विसरून चालणारच नाही . हे त्रिवार सत्य आहे. वैश्विक सत्य आहे. आत्मा विज्ञानदृष्ट्या सिद्ध करता येत  नाही हे आपणाला पक्के माहित आहे. अनुभूती आहे की आत्म्याशिवाय शरीर जिवंतच राहू शकत नाही . हे सर्व ज्ञान संस्कार देणारे शिक्षण आपणाला पाहीजे आहे कि ज्यायोगे विश्व तणावरहित होईल, विश्वाचे  कल्याण होयील व विकास होयील.
दृष्टी बदलली पाहिजे. ऐकून नव्हे तर पाहून शिक्षण  दिले गेल पाहिजे . यात आचार  विचार महत्वाचे आहेत. मुळ संकल्पना महत्वाची आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत सुखाने जगा. सुख महत्वपूर्ण आहे. सुखाची निट ओळख झाली पाहिजे. ते निट समजून घेतले पाहिजे. सुख चिरकाल टीकणारे हवे. जीवनाच प्रयोजन हे आहे कि आपण दीर्घ आणि सुखाने जगावे. आहार, निद्रा, भय, मैथुन ह्या प्राण्यांच्या गरजा आहेत पण मनुष्य प्राणी हा त्याहून वेगळा आहे. त्या चार गोष्टी म्हणजे मनुष्यासाठी जीवन नव्हे. ते तर हवेच पण त्याहून वेगळे काही तरी मनुश्यास हवे असते. मनुष्य सामर्थ्याने जीवन जगतो. शिक्षणाचा उपयोग करून घेतो. बलवान आणि दीर्घ आयुश्य सुखाने जगतो तो माणूस. या संघर्षात ताण तणाव नकोत. सबका विकास खुदके साथ, यासाठी धर्म आवश्यक आहे. Man does not live by bread alone. स्वधर्माच्या पालनात त्याला शाश्वत सुख मिळते. शिक्षित मनुष्य हा धारक बनायला हवा. ते धारण केलेले शिक्षणच त्याला पडू देत नाही. ते शिक्षण आपल्याला अभिप्रेत आहे. ते आपल्या भारतीय संस्क्रूतीत आहे. शाश्वत सुख, स्वधर्माचे पालन, धारणात धर्म, इहलोकात आणि परलोकातही, दोन्हीकडे सृष्टीला चालविण्याचे काम शिक्षणाने केले पाहिजे, ते खरे शिक्षण. जड आणि चेतन या दोन्हीनाही धर्म जोडतो. या एकत्रीकरणात सुख आहे. ज्ञान आणि विज्ञान जोडले जावे. विद्यार्जनाने अमृत मिळाले पाहिजे फक्त रोटी नाही. ही समग्र ज्ञानाची दृष्टी आमची प्राचीन शिक्षणनिती आहे. सा विद्या या विमुक्तये. फक्त सक्षम प्राणी होणे हे विदयेचे ध्येय नाही. मनुष्याची वास्तविक स्वतंत्रता. स्वला ओळखणे. यात मनमानी नाही. स्वरूपातून निघणारी स्वाभाविकता आहे. मरण येत नाही म्हणून जगतो याला काही अर्थ नाही. या व अश्या अनेक अविचारातून मुक्त करते ती विद्या. ती मनुश्याला पोषक बनवते, निर्मिती क्षमता देते. त्याला शिक्षण म्हणतात. हे अव्वल दर्जाचे शिक्षण, दिसत नाही. ते दिसण्याच्याही पलीकडचे असते. त्यासाठी प्रयोग करा. तेही श्रद्धेने. श्रद्धा... श्र म्हणजे श्रम व धा म्हणजे धारण. श्रम करून धारण केले जाते ते. म्हणजे श्रद्धेने तपासा. प्रश्न करा आणि मग विश्वास पटल्यावर धारण करा. शिक्षण देणारा भरोसेवाला असावा. ईश्वराला कुणी पाहिले आहे ? तरी पण आपण विश्वास ठेवतो. तो श्रद्धेय असतो. रामकृष्ण परमहंसासारखा. अशी मंडळी शिक्षण क्षेत्रात हवीत. वेदाने सांगितले तरी तर्काच्या ऐरणीवर घासून तपासून पाहा. प्रयोग करा. चाणक्याने सगळे प्रयोग स्वतः केले अन मग ते अस्तित्वात आणले. म्हणून अनुभव, अनुभूती महत्वाची आहे. त्यासाठी शिकणारा कसा पाहिजे? नम्र, श्रद्धाळू, सेवाभावी, ऐकून पाहून मनन चिंतन करून प्रयोग करून अनुभव घेवून आचरणात उतरवणारा हवा. ही दृष्टी  सतत सर्व ठिकाणी हवी.
शिक्षणाने आपल्याला काय मिळते ?
1. सर्वांबरोबर सामंजस्याने राहण्याची क्षमता.
2. स्वतःची क्षमता.
3. व्यक्तित्व विकास.
4. क्षमता व्यक्त करण्याची कला.
5. नम्रता.
6. संवेदना...परपीडा जाणणारा.
7. विवेकी ज्ञान. ( विवेकहीन ज्ञान रडवते.)
8. विज्ञान आणि तत्वाचे मूल्य.
9. उन्नत शांती देणारे ज्ञान.
10. स्वगौरव, स्वतःची प्रतीष्ठा, आत्मविश्वास, निर्भयता.
11. कुशल ज्ञान.
12. सद्गुण युक्त मनुष्यता.
13. कार्य तत्परता....स्वान्त सुखाय, बहुजन हिताय.

शिक्षणासाठी काही तत्थे, पत्थे असावीत असे मला वाटते ती अशी.....
1. शिक्षण हे आपल्या मातृभाषेतूनच असावे. आपल्याला ज्या भाषेतून स्वप्ने पडतात ती आपली  भाषा. जीवनाच्या स्वप्नपूर्तीचा आनंद आपणाला आपल्या मातुभाषेतुनच मिळतो. म्हणून आपले शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे.
2. शिक्षण सर्वसमावेषक असावे.
3. सर्वाना सुलभरीत्या घेता यावे.
4. सर्वोत्तम, गुणवत्तापूर्ण असावे. सशक्त शास्त्रासाठी हे आवश्यक आहे.
5. विद्या मुक्त करी म्हणजे सर्व बंधनातून मुक्त करणारी, विद्या युक्त करी म्हणजे योग्य करणारी, विद्या अर्थ करी, असे सर्वांगीण शिक्षण असावे.
6. शिक्षण अनुभूती देणारे असावे.
7. व्यावहारिक ज्ञान देणारे असावे.
8. अगदी गर्भसंस्कारापासून ते वैज्ञानिक संशोधनापर्यंत सर्वव्यापक असावे.
9. शासनमुक्त व स्वायत्त असावे.
10. समाजपोषित व समाजाधारित असावे.

आनंद चिंतन

••• आनंद चिंतन •••

आनंद एक अनुभूती आहे ते एक फिलींग आहे. ते एक वाटणं आहे. प्रत्यक्षात ते नाही आहे. ते फक्त भासते . प्रत्यक्षात नसते.

आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे दु:ख हा एक अनुभव आहे जे प्रत्येकाकडे आहे. तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे

 कोणतीच भौतिकता आनंद देत नाही. फक्त आणि फक्त आध्यात्मिकताच आनंद देऊ शकते. आनंद फक्त आध्यात्मिक लोकानाच मिळतो. भौतिक किंवा सांसारीक लोकांना तो अजिबात मिळत नाही. तो मिळाला असं जेंव्हा त्याना वाटतं तेंव्हा तो आनंद नसून सुख असतं. सुख आणि आनंद यामधे खूप मोठी तफावत आहे. आनंद चिरंतन टिकतो. तो नाश पावत नाही किंवा रूपांतरीत होत नाही. सुख वेगळे. ते टिकावू नसते ज्याला आपण सुख समजतो ते दुखही असू शकतं. सूख सापेक्षतावादी आहे. स्थल काल वक्तीनूरूप ते बदलते. तसेच दुख्खाचही आहे.

आपण आनंदाचा विचारच योडून देवू यात. तो आपला प्रांत नव्हे. त्यासाठी प्रयत्नशील असावे पण आग्रही असू नये. कारण आनंद आपोआप मिळतो. तो मिळवावा लागत नाही. आध्यात्मातील तो सर्वोच्च स्तर आहे. आपल्यासारख्या संसारी माणसाने संयारात राहूनही अध्यात्मिक होण्याचा प्रयत्न केल्यास निदान सुख तरी काही प्रमाणात पदरात पडू शतेल. पण त्यासाठीही आपण सात्विक असणं गरजेचं आहे. आनंदरूपी पर्वताचा हा पायथा आहे. हे सुख निरपेक्ष आहे असं निदान वाटतं तरी. पण काही का असेना आपल्यासाठी ते सर्वोच्च आहे. म्हणून त्यासाठी आटोकाट प्रयत्न करावा. सात्विकतेचा तो परीपाक आहे. सापेक्ष सुख हे राजस स्वरूपाचं असतं. राजाच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत ते टिकतं . सत्ता गेली सुख गेलं आणि डायरेक्ट दुख्ख आलं. म्हणजे ते राजाचं नसून सत्तेचं असतं. सत्तेत असूनही सत्ता गेली तर काय या दुख्खात तो असतो कि जे तो लपवून ठेवतो आपल्याला दाखवत नाही. मग तो नक्की सुखात असतो कि दुख्खात ? हे एक ऊदाहरण झालं पण प्रत्येकाचं हे असंच असतं. याहून दुसरं नसतं. या दोहोतही नसतात ते तामस, क्षुद्र. माणसातल्या वेषातले पशू. असं म्हणणं हा पशूचा अपमान होईल. कारण त्याना ती बौद्धिक सोय नसल्याने ते त्यांचाकडून आपे़क्षीतच नाही. क्षुद्र माणूस म्हणजे पशूच्यीही पलीकडचा. आपेक्षाभंगाचा कळस.

हे वास्तव आपण समजून ऊमजून घ्यायला हवं. त्यावर आत्मचिंतन करायला हवं. व मग त्याप्रमाणे पायर्यापायर्यानी सुखमार्गे आनंदाच्या दिशेनं निघायला हवं. अन्यथा पुढचा जन्म आपल्या या जन्मातील वर्तनावरून मिळणार आहे. हे निश्चित. म्हणूनच म्हटले जाते ना कि आपले भविष्य,  आपला विचार अर्थात आपले कर्म ठरवते. मग हे सर्व आपल्या हाती असताना परत परत आपण देवादिकांचा, सो कॉल्ड आसाराम, आयाराम, रहीम यांचा आश्रय का घेतो ? आपले सर्व प्रयत्न संपल्यावर आपण परमेश्वरावर भार टाकावा असे म्हणतात. पण हेही खरे आहे कि प्रयत्नांती परमेश्वर असतेच. याचाच अर्थ प्रयत्न कमी पडला. प्रयत्नाचं सर्वोच्च टोक म्हणजे परमेश्वर. म्हणजे आपण खोटं बोलतो. आपले असत्य लपवतो. त्यासाठी कशा न कशाचा तरी आधार घेतो, निमित्त शोधतो. आपणच आपली फसवणूक करतो.

हे झालं माझं स्वैर आत्मचिंतन. आपल्याला काय वाटतं तेही सांगा. त्यामुळे निदान विचाराना तरी दिशा मिळेल. विचार हे मनातून येतात त्यानुळे ते प्रभावी असतात. त्याची ताकद अचाट आहे. त्याने ठरवले कि सर्व काही होतेच. तो आत्म्याचा हुंकार असतो. म्हणून जगात अवघड असेल पण अशक्य काहीच नाही. केल्याने होत आहे पण आधी केलेची पाहीजे. या संत ऊक्तींचा आधार घेऊन आपण पुढचा प्रवास चालू ठेवला पाहीजे. ठेवू यात.

सर्वे सुखिना संतु
सर्वे संतू निरामया
सर्वे भद्राणी पशन्तु
ना कश्चिद दुख्खमाप्नुयात

About us

: परिचय पत्र :

1. पूर्ण नाव  : पांडुरंग वसंत कुलकर्णी.
2. पूर्ण पत्ता : २९, पूर्वांचल कोलोनी, पंचक,         केनोल रोड, जेल रोड, नाशिक रोड, नाशिक ४२२१०१ मोबा : ७७६९०५५८८३
3. वय       : ६० वर्षे. ( निवृत्ती )
4. शिक्षण    : डिप्लोमा इन मेकानिकल    इंजिनियरिंग. ( डी. एम. ई. )
5. गेली २० वर्षे नामांकित अंतरराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर नोकरी व २० वर्षे स्वतःच्या इंजिनियरिंग कंपनीचा चेअरमन व कार्यकारी संचालक. नुकतीच निवृत्ती घेतली.
6. छंद व व्यासंग :
* निबंध, लेख, कथा, कविता लिहिणे व साहित्य सम्मेलन, आकाशवाणी,
 मासिके, नियतकालिके, वर्तमानपत्रे, साप्ताहिके इत्यादी ठिकाणी सादर करणे.
* व्याख्यान, सिनेमा, नाटक, सहली, कला, संगीत, गायन , नृत्य , वादन,
 निसर्ग यात रममाण होणे व आनंद लुटणे. गप्पा टप्पा इत्यादी.
7. पहिला वाहिला कविता संग्रह येवू घातलेला आहे.
8. लेख संग्रहाची तयारी चालू आहे.
9. पटकथालेखन चालू आहे.
10. नाशिक कवीचा २०१६ चा कवितेसाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला.
11. मुळ गाव भोसे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. येथे वडिलोपार्जित घरदार, शेतीवाडी आहे. नेहमी येणे जाणे असते.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Name : Pandurang Vasant Kulkarni Address : 29, Purvanchal Colony, Panchak, 
Canal road, Jail road, Nashik road
Nashik 422101 Mobile : +91 7769055883 E mail : pvkulkarni.lekhan@gmail.com