••• आनंद चिंतन •••
आनंद एक अनुभूती आहे ते एक फिलींग आहे. ते एक वाटणं आहे. प्रत्यक्षात ते नाही आहे. ते फक्त भासते . प्रत्यक्षात नसते.
आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे दु:ख हा एक अनुभव आहे जे प्रत्येकाकडे आहे. तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे
कोणतीच भौतिकता आनंद देत नाही. फक्त आणि फक्त आध्यात्मिकताच आनंद देऊ शकते. आनंद फक्त आध्यात्मिक लोकानाच मिळतो. भौतिक किंवा सांसारीक लोकांना तो अजिबात मिळत नाही. तो मिळाला असं जेंव्हा त्याना वाटतं तेंव्हा तो आनंद नसून सुख असतं. सुख आणि आनंद यामधे खूप मोठी तफावत आहे. आनंद चिरंतन टिकतो. तो नाश पावत नाही किंवा रूपांतरीत होत नाही. सुख वेगळे. ते टिकावू नसते ज्याला आपण सुख समजतो ते दुखही असू शकतं. सूख सापेक्षतावादी आहे. स्थल काल वक्तीनूरूप ते बदलते. तसेच दुख्खाचही आहे.
आपण आनंदाचा विचारच योडून देवू यात. तो आपला प्रांत नव्हे. त्यासाठी प्रयत्नशील असावे पण आग्रही असू नये. कारण आनंद आपोआप मिळतो. तो मिळवावा लागत नाही. आध्यात्मातील तो सर्वोच्च स्तर आहे. आपल्यासारख्या संसारी माणसाने संयारात राहूनही अध्यात्मिक होण्याचा प्रयत्न केल्यास निदान सुख तरी काही प्रमाणात पदरात पडू शतेल. पण त्यासाठीही आपण सात्विक असणं गरजेचं आहे. आनंदरूपी पर्वताचा हा पायथा आहे. हे सुख निरपेक्ष आहे असं निदान वाटतं तरी. पण काही का असेना आपल्यासाठी ते सर्वोच्च आहे. म्हणून त्यासाठी आटोकाट प्रयत्न करावा. सात्विकतेचा तो परीपाक आहे. सापेक्ष सुख हे राजस स्वरूपाचं असतं. राजाच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत ते टिकतं . सत्ता गेली सुख गेलं आणि डायरेक्ट दुख्ख आलं. म्हणजे ते राजाचं नसून सत्तेचं असतं. सत्तेत असूनही सत्ता गेली तर काय या दुख्खात तो असतो कि जे तो लपवून ठेवतो आपल्याला दाखवत नाही. मग तो नक्की सुखात असतो कि दुख्खात ? हे एक ऊदाहरण झालं पण प्रत्येकाचं हे असंच असतं. याहून दुसरं नसतं. या दोहोतही नसतात ते तामस, क्षुद्र. माणसातल्या वेषातले पशू. असं म्हणणं हा पशूचा अपमान होईल. कारण त्याना ती बौद्धिक सोय नसल्याने ते त्यांचाकडून आपे़क्षीतच नाही. क्षुद्र माणूस म्हणजे पशूच्यीही पलीकडचा. आपेक्षाभंगाचा कळस.
हे वास्तव आपण समजून ऊमजून घ्यायला हवं. त्यावर आत्मचिंतन करायला हवं. व मग त्याप्रमाणे पायर्यापायर्यानी सुखमार्गे आनंदाच्या दिशेनं निघायला हवं. अन्यथा पुढचा जन्म आपल्या या जन्मातील वर्तनावरून मिळणार आहे. हे निश्चित. म्हणूनच म्हटले जाते ना कि आपले भविष्य, आपला विचार अर्थात आपले कर्म ठरवते. मग हे सर्व आपल्या हाती असताना परत परत आपण देवादिकांचा, सो कॉल्ड आसाराम, आयाराम, रहीम यांचा आश्रय का घेतो ? आपले सर्व प्रयत्न संपल्यावर आपण परमेश्वरावर भार टाकावा असे म्हणतात. पण हेही खरे आहे कि प्रयत्नांती परमेश्वर असतेच. याचाच अर्थ प्रयत्न कमी पडला. प्रयत्नाचं सर्वोच्च टोक म्हणजे परमेश्वर. म्हणजे आपण खोटं बोलतो. आपले असत्य लपवतो. त्यासाठी कशा न कशाचा तरी आधार घेतो, निमित्त शोधतो. आपणच आपली फसवणूक करतो.
हे झालं माझं स्वैर आत्मचिंतन. आपल्याला काय वाटतं तेही सांगा. त्यामुळे निदान विचाराना तरी दिशा मिळेल. विचार हे मनातून येतात त्यानुळे ते प्रभावी असतात. त्याची ताकद अचाट आहे. त्याने ठरवले कि सर्व काही होतेच. तो आत्म्याचा हुंकार असतो. म्हणून जगात अवघड असेल पण अशक्य काहीच नाही. केल्याने होत आहे पण आधी केलेची पाहीजे. या संत ऊक्तींचा आधार घेऊन आपण पुढचा प्रवास चालू ठेवला पाहीजे. ठेवू यात.
सर्वे सुखिना संतु
सर्वे संतू निरामया
सर्वे भद्राणी पशन्तु
ना कश्चिद दुख्खमाप्नुयात

No comments:
Post a Comment