Monday, 5 March 2018

सोशल मेडीया

सोशल मेडीया च्या धामधुमीत
वाचन क्षमतेची स्थिती..................
=====••=======••=====

सोशल मेडीया हे प्रसार आणि प्रचाराचे प्रभावी माध्यम आहे यात शंकाच नाही. या आधुनिक तंत्रज्ञानाचा ऊपयोग आपण करुन घ्यायलाच हवा. ब्लॉग, फेसबुक, ई बुक, ई पेज, किंडल, वॉटसप, ट्विटर , गुगल, यु ट्युब ईत्यादींच्या द्वारे आपण सोशल मेडीयाचा वापर वाचनासाठी करतो.
आता आपला प्रश्न आहे की या सर्व सोशल मेडीयाचा वापराने आपली वाचनक्षमता कमी झाली आहे का?
वाचन आपण कोणत्याही गोष्टीचा वापर करून करू शकतो. त्यासाठी पुस्तकच वापरलं पाहीजे असं काहीच नाही. ज्ञान संपादन करण्यासाठीचे डोळे हे ज्ञानेंद्रीय आहे. त्याचा
साधन म्हणून आपण वापर करतो व वरील सर्व ठीकाणी वाचन मजकूर असतो तो आपण वाचतो. त्यामुळ् हा मुद्दा क्रीस्टल क्लीअर आहे.
त्यात काहीच वावगं नाही. ऊलटपक्षी या गोष्टीमुळे आपणास हवे ते हवे तेंव्हा हव्या त्या स्वरूपात सहज ऊपलब्ध होते.
वाचन कसं करतो कोठुन करतो हा मुद्दा नाही तर मुद्दा हा आहे की सोशल मेडीयाच्या धामधुमीत वाचन क्षमता कमी होत आहे का?
वरील सर्व वाचनाच्या , ऐकण्याच्या , लिहीण्याच्या , त्वरीत रिस्पॉन्स देण्याच्या ईंन्स्टंट प्रकारामुळे पुर्वीसारखे शांत चित्ताने , आत्मचिंतन करीत, विचाराचे मंथन करीत, चर्वण करीत वाचन होत नाही. त्यामुळे वाचन व्यवस्थित होत नाही. वाचनाला न्याय दिला जात नाही. त्यावर चिंतन होत नाही. मन वरील सर्व प्रकारात गुंतते. आणि मग एक ना धड भाराभर चिंध्या असा प्रकार होतो. विविध प्रकारच्या साहीत्यिक स्पर्धा जशा की निबंध, लेख, कविता, नाटक, एकांकीका, वात्रटीका, चारोळी, गझल आत्यादी अनेकानेक ईंन्स्टंट प्रकार अॉनलाईन चालु असतात. पळा पळा कोण पुढे पळे तो असा सर्व प्रकार होवून जातो.
या द्रुष्टीकोनातून पाहील्यास आपणास असे निच्छितपणे म्हणता येईल की होय खरं आहे
 वाचन क्षमता कमी होत आहे. सोशल मेडीयाच्या त्या ईन्स्टंट जंजाळात जास्त गुरफटून न जाता सात्विक वाचन केले, त्यावर चिंतनपर लिहीले तर लिखाणात , विचारात व अर्थातच आचारात सकसता येयील. वाचनाची क्षमता यात योग्य , सात्विक, चिंतनशील, विनोदी, मन प्रसन्न करणारं, व्यक्तिमत्व घडविणारं वाचन अभिप्रेत आहे किंवा असावं. त्यासाठी वेळ हवा. घिसाडघाई काही कामाची नाही. चांगुलपणात तडजोड नसावी. हे कटू असलं तरी स्त्य आहे. म्हणून टिकावू आहे. यावर ऊपाय म्हणजे वाचन अविरत, सातत्याने करावे. त्यामुळे विचारसरणी विकसीत होते. सोशल मेडीयाचा वापर मर्यादीत, हवा तेवढा, हवा तेथेच करावा. त्याच्या आहारी जावू नये.
एवढं कटाक्षान् , पथ्य म्हणून पाळले तर वाचन क्षमता वाढेल. ते सद्या होताना दिसत नाही. म्हणून ती कमी होत चालली आहे. अर्ध्या हळकुंडात पिवळं होण्याच्या मोहात लोक अडकत चालले आहेत. हे ईष्ट नाही. हानीकारक आहे. असो तर आज सोशल मेडीयाच्या धामधुमीत वाचनक्षमता कमी होत चालली आहे हे सत्य आहे पण ते हानीकारक आहे हे मला आग्रहाने सांगावेसे वाटते. वाचनक्षमता वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू यात.

No comments:

Post a Comment