Monday, 5 March 2018

प्रेम: काल आज आणि ऊद्या

 ........प्रेम:  काल आज आणि ऊद्या ........

कालचे प्रेम पूर्णपणे त्यागमयी होते. त्यात वासनेचा वास नव्हता. ऊदात्त प्रेम होते ते. हिर रांझा, नल दमयंती या जोड्या प्रातिनिधीक स्वरूपात कालचं प्रेम म्हणून ऊल्लेखिता येतील. त्यागावर आधारीत प्रेम. अर्थातच ऊदात्त प्रेम. आत्मिक प्रेमही म्हणता येयील त्यास. एका आत्म्याचं दुसर्या आत्म्यावर असणारं निस्सीम प्रेम. यात मदन महत्वाचा नव्हता. शरीर महत्वाचं नव्हतं. म्हणजेच आपणास असंही म्हणता येईल की द्वैताचं अद्वैतात रूपांतर.

आजचं प्रेम सर्वश्रूत आहेच. आपण दैनंदीन ऊघड्या डोळ्यानी ते पाहतो. अंतर्मुख होवून सदसदविवेक बुद्धी वापरून विचार कोला तर चित्र स्पष्ट दिसते. पूर्वीसारखं प्रेम राहीलं नाही. हे आपल्या बोलण्यात येतं अर्थातच आपण सर्व स्तरावरचं प्रेम ग्रुहीत धरतो आहे. प्रेमापेक्षा पैसा जास्त जवळचा होवू पहात आहे.नाती दुरावत आहेत. प्रेम कमी होत आहे. पैसा प्रेमाची जागा घेवू पहात आहे.मर्यादा पुरुषोत्तम राम लक्ष्मण भरताचं कालचं प्रेम कुठं गेलं? राम सीता, ऊर्मिला लक्ष्मणाचं प्रेम कुठं गेलं? हरवलं ते प्रेम. आध्यात्मिक प्रेमाची जागा भौतिक प्रेमाने जवळपास घेतलेलीच आहे.
हे कसं झालं कळायच्या आत ऊद्याचं अत्याधुनिक प्रेम ऊंबर्यावर आहे आपल्या घरातच नाही तर मनात ह्रुदयात ठाण मांडून बसायला तयारच आहे.

ते असेल ऊद्याचं प्रेम. जे आपण अमेरीकेसारख्या देशात आजही पाहतो. जन्म ेणं आईचं काम. त्यानंतर संबंध नाही. पशुसारखं. म्हणजेच नात्यातली पाशवी व्रुत्ती. नवरा बायको म्हणजे नर मादी. संभोग म्हणजेच प्रेम ही नवीन व्याख्या ऊद्याच्या प्रेमाची असेल.आत्मिक प्रेम ही बुरसटलेल्या विचारांची प्रेमप्रणाली लयास जाईल. लीव्ह ईन रीलेशनशीप ही पद्धत तर चालू झालेलीच आहे. त्याचा परमोच्च बिंदू ऊद्याच्या प्रेमात पहायला मिळेल. अशी लीव्ह ईन रीलेशनशीप कॉन्ट्रेक्टस हळू हळू कमी कालावधीसाठीच असतील कारण ती जास्त टीकणारच नाहीत.
आणि याला ते आधुनिकता म्हणतील.

थोडक्यात सांगायचं म्हणजे कुठे तो एकवचनी, एकबाणी, एकपत्नी राम, भरताचं बंभूप्रेम, दशरथाचं प्रजाप्रेम, ऊर्मिलेचं सीतेचं पतीप्रेम अन कुठेआजचंबेगडीलव्हईनरीलेशनशीपमधलं प्रेम? ऊद्याच्या प्रेमाची तर कल्पनाच करवत नाही. कलीयुगाचा महीमा . दुसरं काय? भौतिकतेकडून आध्यात्मिकतेकडे हा विचारप्रवाह वळला तर सोन्याहून पिवळे अन्यथा ऊपभोगवाद बळावून त्यातच होरपळून जाणं नशीबी येईल येवढं मात्र आवर्जून सांगावसं वाटतं. संस्काराय नम:

No comments:

Post a Comment